Manish Sisodia CBI Raid : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, म्हणाले- तपासात पूर्ण सहकार्य करेन!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सीबीआयचे पथक मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी ट्विट केले की, ‘सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-1 बनलेला नाही.”Manish Sisodia CBI Raid Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia’s house raided by CBI, said- I will cooperate fully in the investigation!



आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘हे लोक दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या अद्भुत कामामुळे नाराज आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल. आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू, जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही.

Manish Sisodia CBI Raid Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia’s house raided by CBI, said- I will cooperate fully in the investigation!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात