IT raids : “हे” तर दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण; राहुल कनालांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे पडताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच शिर्डी देवस्थानचे एक विश्वस्त आणि आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे कोअर कमिटीतील एक सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतल्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले आहेत. IT raids: “This” is Delhi’s attack on Maharashtra; Aditya Thackeray’s reaction after income tax raids on Rahul Kanala’s house

मात्र आपल्या निकटवर्तीयाच्या घरावर छापे पडताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे तर दिल्लीचे महाराष्ट्रवरचे आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महापालिका आणि स्थानिक निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते घाबरले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे छापे पडत आहेत. ज्या राज्यांमध्ये आधी निवडणुका झाल्या, तेथे देखील केंद्रीय तपास संस्थांनी असेच छापे घातले होते पण महाराष्ट्रात असे छापे घालून महाराष्ट्र केंद्र सरकारपुढे आणि भाजपपुढे झुकणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.राहुल कलाल यांच्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे सध्या सुरू असून तेथे नेमके काय सापडते याचे तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत. राहुल कनाल हे शिर्डी देवस्थानचे विश्वस्त असून मातोश्रीच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विशेषत: आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीचे ते एक सदस्य सदस्य आहेत.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी बनविण्याच्या वेळी शिवसेनेकडून राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा होती. मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पण ते सदस्य होते.

राऊतांची दुपारी 4.00 वाजता प्रेस कॉन्फरन्स

संजय राऊत हे आज दुपारी चार वाजता शिवसेना भवन मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असणारे 13 पाणी पत्र सादर करणार आहेत. परंतु, त्या आधीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ॲक्शन मोड मध्ये येऊन त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाच्या घरांवर छापे घातले आहेत.

IT raids: “This” is Delhi’s attack on Maharashtra; Aditya Thackeray’s reaction after income tax raids on Rahul Kanala’s house

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर