BBC वर पडलेले इन्कम टॅक्सचे छापे नव्हेत, तर ते सर्वेक्षण!! पण सर्वेक्षण तरी का करावे लागले?? वाचा सविस्तर!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्याच्या बातम्या आल्या नंतर काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी जोरदार हल्ला-गुल्ला सुरू केला असला तरी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे, तो म्हणजे हे छापे नसून ते सर्वेक्षण आहे. itis pertinent to note that the above exercise conducted by the tax authorities, is called “survey” not search/raid as per the provisions of the Income Tax Act.

बीबीसीने आपल्या फायद्यातला बहुतांश भाग भारतीय प्राप्तिकर कायद्याचे उल्लंघन करून इतरत्र वळविला आहे. या संदर्भात त्यांना अनेकदा नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. पण बीबीसीने त्या नोटिशींकडे नेहमी आणि वारंवार दुर्लक्ष केले. त्यांचे उत्तर कधीच दिले नाही. या संदर्भातले हे सर्वेक्षण आहे. अनेक कंपन्याचे असे सर्वेक्षण नियमित पणे केले जाते. त्याचा संबंध छापे अथवा सर्च ऑपरेशन याच्याची अजिबात जोडता कामा नये, असा खुलासा झाला आहे.

बीबीसीने सातत्याने भारतीय प्राप्तिकर कायद्याचे वर्षानुवर्षे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात कायदेशीर नोटीसा पाठवून देखील बीबीसीने आपण या कायद्याच्या पलिकडचे अथवा वरचे आहोत, असे औधत्य दाखवून त्या नोटिशींकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या फायद्यातला मोठा भाग कायद्याच्या दृष्टीने उल्लंघन ठरेल अशा ठिकाणी वळवत राहिले. इतकेच नाही तर प्रायसिंग मॅन्युप्युलेशन, प्रायसिंग नॉर्मचे सातत्याने उल्लंघन करून बीबीसीने कायम नोटिंशीकडे दुर्लक्ष करून उत्तर दिले नाही. म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे सर्वेक्षण करावे लागले आहे. सर्वेक्षणाचा मूळ फोकस वर उल्लेख केलेल्या बाबींवरच आहे, असा खुलासा झाला आहे.

itis pertinent to note that the above exercise conducted by the tax authorities, is called “survey” not search/raid as per the provisions of the Income Tax Act.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात