‘I.N.D.I.A आघाडीचे लोक गरिबांची प्रगती होताना पाहू शकत नाहीत’, मोदींचा रामटेकमध्ये हल्लाबोल!

poor Modis attack in Ramtechi

आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात आली नाही का? असा सवालही केला.


विशेष प्रतिनिधी

रामटेक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशभरात जाहीर सभा आणि रोड शो करत आहेत. बुधवारी मोदी महाराष्ट्रातील रामटेक येथे पोहोचले. जिथे त्यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. बाबा जुमदेवजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. या पवित्र भूमीतून मी महान त्यागी बाबा जुमदेवजी गौंडराजा भक्त बुलंदशाह आणि बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.I.N.D.I.A leaders cannot see the progress of the poor Modis attack in Ramtechi



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 19 एप्रिलला तुम्हाला केवळ एक खासदार निवडून द्यायचा नाही, तर पुढील हजार वर्षांचा भारताचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला मतदान करावे लागेल. विकसित भारताच्या संकल्पाला मतदान करावे लागेल. आजकाल इंडिया आघाडीचे सदस्य आणि त्यांचे लोकही असा खोटा प्रचार करत आहेत की मोदी तिसऱ्यांदा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. जेव्हापासून मी राजकारणात आलो आहे, तेव्हापासून त्यांनी एकच रडगाणे गायले आहे. त्यांच्याकडे नवीन कल्पना नाहीत.

तसेच, आणीबाणीच्या काळात पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लोकशाही धोक्यात आली नाही का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. तसेच त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती का?, गरीब माणसाचा मुलगा पंतप्रधान होताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसायला लागले, असंही मोदी म्हणाले.

टीव्ही आणि मीडियाचे लोक सतत सर्व्हे दाखवत आहेत. या सर्वेक्षणात एनडीएचा बंपर विजय दिसून येत आहे. पण आज मला मीडियाच्या लोकांना मदत करायची आहे. भाऊ, सर्वेक्षणावर एवढे पैसे का खर्च करता? मला त्यांना पैसे वाचवण्यासाठी एक फॉर्म्युला द्यायचा आहे. मोदी म्हणाले, जेव्हा मोदींविरोधात अपशब्द वाढतात, तेव्हा ट्रेंड समजून घ्या, पुन्हा एकदा मोदी सरकार. जेव्हा हे लोक माझ्या दिवंगत वडिलांना किंवा आईला शिव्या घालू लागतील, तेव्हा पुन्हा एकदा मोदी सरकार येणार समजून घ्या. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित होत असताना पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हा ट्रेंड समजून घ्यायला हवा.

I.N.D.I.A leaders cannot see the progress of the poor Modis attack in Ramtechi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात