राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा; पण महाराष्ट्र विधानसभा ताकदीने लढवायला मनसेचे इंजिन “मोकळे”!!

Raj thackeray supporters Modi in centre

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रात मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण महाराष्ट्र विधानसभा ताकदीने लढवायला मनसेचे इंजिन “मोकळे”, असेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजच्या गुढीपाडव्याच्या भाषणाचे स्वरूप होते!! Raj thackeray supporters Modi in centre, but MNS free to fight maharashtra assembly elections alone

शिवाजी पार्कावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याची मनसेची भूमिका जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे देखील महायुतीमध्ये सामील होणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

राज ठाकरे यांनी यावेळी दिल्लीत नेमकं काय काय झालं? यावर देखील खुलासा केला. त्यानंतर भूमिका मांडताना त्यांनी कार्यकर्त्यांना मनसेच्या इंजिन चिन्हावर ताकदीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

पुढील 50 वर्षांचा विचार आपल्याला करायचा असतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. फडणवीसांना मी वाटाघाटीत मला पाडू नका असं सांगितलं. मला राज्यसभा आणि विधानपरिषदी नको सांगितलं. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. मनसे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आहे. मला इतर काहीही अपेक्षा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

आपला देश 10 वर्षांनी पुन्हा वयस्कर होईल. नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. देशात 6 लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं. हे आता होता कामा नये. महाराष्ट्र जो कर भरतो त्याचा मोठा वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका देखील राज ठाकरे यांनी मांडली आहे. संपूर्ण देशाला मोदींकडून अपेक्षा आहे. आगामी निवडणूक खड्ड्यात जाणार की वर हे भविष्य ठरवणारी आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय रस्सीखेचावर देखील भाष्य केलं. तसेच राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार का? या चर्चित असलेल्या विषयावर देखील आपली भूमिका व्यक्त केली. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असेल तर तेव्हाच झालो असतो. त्यावेळी शिवसेनेच्या 32 आमदारांचा आणि 7 खासदारांचा मला पाठिंबा होता, पण मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेन. मी आजही सांगतोय, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Raj thackeray supporters Modi in centre, but MNS free to fight maharashtra assembly elections alone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात