विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदार संघात गजानन कीर्तिकर “सेफ गेम” म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कारण ईडीच्या नोटीशीपुढे आपला मुलगा अमोल कीर्तिकर लोकसभेच्या मैदानात टिकू शकणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. गजानन किर्तीकर वयाच्या 80 व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने तिथून तिकीट मिळण्याची अपेक्षा असलेल्या संजय निरुपम यांचा पत्ता परस्पर कट झाल्याचे मानण्यात येत आहे. Gajanan Kirtikar against Son Amol kirtikar
वास्तविक गजानन कीर्तिकरांनी आपण वय झाल्यामुळे निवडणूक लढवणार नाही, असे आधीच जाहीर केले होते. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर याची उमेदवारी जाहीर केली. त्याला आधीपासूनच मुंबईतल्या खिचडी घोटाळ्यात ईडीच्या नोटिसा येतच होत्या. त्यामुळे त्याला आणि त्याची पत्नी सुप्रिया यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे अमोल कीर्तिकरच्या निवडणूक लढवण्यावरच मर्यादा येईल.
अशा स्थितीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात कीर्तिकरांपैकी कोणीच निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसेल, तर हातातला मतदारसंघ जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी वयाच्या 80 व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तशी परस्पर घोषणाही करून टाकली. गजानन कीर्तिकरांची प्रत्यक्षात ही “सेफ गेम” आहे
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दोन शिवसेनांमधून बापलेक आमने-सामने येणार अशा बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात तसे खरंच घडणार का??, हा सवाल मात्र तयार झाला आहे. कारण अद्याप कोणीच प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App