यमुना एक्सप्रेस वे वर ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, तीन जखमी


 मृतांमध्ये एक मुलीचाही समावेश; जखमींमध्ये तीन मुलांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

विशेष प्रतिनिधी

नोएडा : यमुना एक्सप्रेस वेवर आज(शनिवार) सकाळी एक रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये एकाच  कुटुंबातील ५ जणांना जीव गमवावा लागला. एक्स्प्रेस वेवर झिरो पॉइंटपासून २५ किलोमीटर अंतरावर एका ट्रकने कारला मागून धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की कारचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. त्यामुळे कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. Fatal truck car accident on Yamuna Expressway five members of the same family killed three injured

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बचावकार्य करत जखमींना गाडीतून बाहेर काढले. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

जखमींमध्ये तीन मुलांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील असून ते जेजे कॉलनी फेज-3 मदनपूर खादर पोलीस स्टेशन कालिंदी कुंज दक्षिण दिल्लीतील रहिवासी होते.

Fatal truck car accident on Yamuna Expressway five members of the same family killed three injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात