आगामी सराव हा भारतात आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव असेल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये होणार्या नऊ दिवसांच्या मेगा नौदल सरावात भारत आपल्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रदर्शन करेल. झपाट्याने बिघडत चाललेले जागतिक भू-राजकीय वातावरण आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनची वाढती लष्करी शक्ती यादरम्यान ५० हून अधिक देश या मेगा सरावात सहभागी होण्याची शक्यता आहे. Indian Navy to exercise with 50 countries next year
पुढील वर्षी 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे ‘मिलन’ या सरावाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. या सरावात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बांगलादेश, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया या देशांचे नौदल सहभागी होणार आहेत. आगामी सराव हा भारतात आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा बहुपक्षीय सराव असेल.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास, प्रगत हवाई संरक्षण ऑपरेशन्स, पाणबुडीविरोधी युद्ध आणि पृष्ठभागविरोधी सराव यांचा समावेश असेल. अरबी समुद्रातील सरावात सहभागी होणारे सर्व देश त्यांचे जवान पाठवणार असल्याची माहिती आहे. मिलान हा द्विवार्षिक बहुपक्षीय नौदल सराव आहे. भारतीय नौदलाने 1995 मध्ये याची सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App