झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती

भाजपा नेते इंद्रासेना रेड्डी नल्लू यांना त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते इंद्र सेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले गेले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या नियुक्त्या करण्यात आनंद होत आहे. दास आणि नल्लू ज्या तारखेपासून त्यांची कर्तव्ये स्वीकारतील त्या तारखेपासून दोन्ही पदावरील नियुक्त्या प्रभावी होतील. Former Chief Minister of Jharkhand Raghuvar Das has been appointed as the Governor of Odisha

रघुवर दास हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून,  2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. झारखंडच्या निर्मितीनंतर दास हे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. ते 1995 मध्ये जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी झारखंडच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

इंद्रसेना रेड्डी नल्लू हे तेलंगणातील भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका आहेत. सध्या राज्यात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती (BRS) सरकार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच दिवशी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराममध्येही मतमोजणी होणार आहे.

Former Chief Minister of Jharkhand Raghuvar Das has been appointed as the Governor of Odisha

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात