तेलंगणात काँग्रेसच्या प्रचारात फक्त राहुल गांधींच्याच चेहऱ्याचा वापर; त्यांच्याच whatsapp चॅनेल वरून “गुपित” उघड!!

नाशिक : तेलंगण विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी राहुल गांधींचे नामकरण “इलेक्शन गांधी” असे केल्यानंतर काँग्रेसने देखील भारत राष्ट्र समितीवर पलटवार करत त्या पक्षाचे नामांतर केले आहे. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती नसून “बीजेपी रिश्तेदार पार्टी” असे आहे, अशी टीका राहुल गांधींनी आज केली.Rahul Gandhi has become poster boy in telangana assembly elections

तेलंगणात मुलुगु मध्ये रामाप्पा मंदिरात दर्शन आणि पूजाच्या केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विजयभेरी यात्रा काढली. या यात्रेत दोन्ही गांधी भावंडे सामील झाली. तेलंगणामध्ये “दुरोलू तेलंगणा” आणि “प्रजाळू तेलंगणा” यांच्यात लढाई आहे. याचा अर्थ तेलंगणाचा राजा विरुद्ध तेलंगणाची प्रजा अशी ही लढाई आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले.



पण या यात्रेतले सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तेलंगणात फक्त राहुल गांधींचाच चेहरा वापरून काँग्रेस प्रचार करताना दिसत आहे. विजयभेरी यात्रेदरम्यान लावलेल्या सर्व पोस्टर्स वर राहुल गांधी आणि स्थानिक नेत्यांचे फोटो दिसत आहेत. या फोटोंमधून क्वचितच सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे छोटे मोठे फोटो दिसत आहेत. पण अनेक पोस्टर्सवरून तर या तिन्ही नेत्यांचे फोटो गायबच आहेत. राहुल गांधी आणि स्थानिक नेते – कार्यकर्ते एवढ्यांचे ठळक आणि मोठे फोटो या यात्रेत दिसत आहेत.

स्वतः राहुल गांधींच्या व्हॉट्सअप चॅनेलवर त्यांनी विजयभेरी यात्रेचे फोटो शेअर केले. त्या फोटोंमधूनच तेलंगणाची निवडणूक राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील लढवली जात असल्याचे “गुपित” उघडकीस आले. पण त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे फोटो “गायब” झाल्याचेही दिसून आले.

2019 मधल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राहुल गांधींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविणे टाळले होते. त्या ऐवजी काँग्रेसमध्ये बरेच मंथन होऊन मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीत काहीसा बदल झाला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या आसपास मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोटोला पोस्टर्स वर स्थान देण्यात येत होते. मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय कार्यक्रम देशभर सुरू देखील झाले होते.

पण 2022 – 23 मध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून स्वप्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये एक विशिष्ट आत्मविश्वास आल्याचा दावा केला गेला आणि त्यातून पुन्हा एकदा राहुल गांधींचा चेहरा निवडणुकीतला “आश्वासक चेहरा” म्हणून वापरायला सुरुवात झाल्याचे तेलंगणा मधून दिसत आहे.

वास्तविक तेलंगणा विधानसभा निवडणुकीतली ही लिस्ट आहे. राहुल गांधींचा चेहरा तेलंगणामध्ये “क्लिक” होऊन काँग्रेसला थोडेफार जरी यश मिळाले, तरी त्या चेहऱ्याचा वापर वाढवून राहुल गांधींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा “पोस्टर बॉय” ठरविण्याचे हे प्रयत्न आहेत. तेलंगण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशावर या प्रयत्नांची पुढची पायरी अवलंबून आहे. तेलंगणात यश मिळाले तर ठीकच, नाहीतर ही गाजराची पुंगी ठरवून ती मोडून खायची ही काँग्रेसची तयारी आहेच!!

Rahul Gandhi has become poster boy in telangana assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात