. या युद्धात हमासला इराणचा पाठिंबा आहे, तर अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. इस्रायली लष्कर गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनांवर जोरदार बॉम्बफेक करत आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. Israel Hamas War US announces new sanctions on Iran’s ballistic missile and drone programs
इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांवर अमेरिकेने नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. या युद्धात हमासला इराणचा पाठिंबा आहे, तर अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने इस्रायलविरोधात उचललेले हे पाऊल मोठी कारवाई मानली जात आहे.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये भेट झाली. बायडेन म्हणाले की, ”बहुतेक पॅलेस्टिनी हमासशी संबंधित नाहीत. हमास पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. हमास गाझामधील निरपराध लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे.”
स्कॉटलंडची गाझावासीयांना आश्रय देण्याची इच्छा; पंतप्रधान युसूफ यांची ब्रिटनपेक्षा वेगळी भूमिका
याचबरोबर ”पॅलेस्टिनी लोकांनाही खूप त्रास होत आहे. काल गाझा येथील इस्पितळात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याने मला दुःख झाले. आज आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, हे गाझामध्ये दहशतवादी गटाने डागलेल्या रॉकेटचे परिणाम असल्याचे दिसते. संघर्षाच्या काळात लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी अमेरिका ठामपणे उभी आहे.” असं बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App