वृत्तसंस्था
माजलगाव : कोरोना चाचणीच्या नावाखाली माजलगाव (जि. बीड) शहरात शस्त्राच्या धाकाने अज्ञातांनी लाखो रुपये लंपास केले. भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला.Corona looted the city of Majalgaon under the guise of testing, lamping lakhs of rupees at gunpoint
सहा अज्ञात दरोडेखोरांनी चूप बैठो हम करोना टेस्ट कर रहे है असे म्हणत घरातील लाखो रुपये लुटले. वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे आणि सावित्री लक्ष्मण शिंदे हे दाम्पत्य तीन विवाहित मुला सुना नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात.
मात्र, बुधवारी (१ डिसेंबर) रात्री ११ वाजता मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले. मेन गेटला कुलूप लाऊन पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान, खालच्या हॉलमध्ये संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपले. पहाटे मेन गेटचे कुलूप तोडण्याचा आवाज शिंदे दाम्पत्याला आला.
दरम्यान६ अज्ञात दरोडाखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडा-ओरडा केला. परंतु, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना काठीने मारहाण केली. चूप बैठो हम याह करोना टेस्ट कर रहे है असे दरडावून म्हणत घरातील समानाची नासधूस करत ऐवज आणि रोख रक्कम लुटून नेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App