सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय ; रेशन धान्य हव असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या


जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे निम्मी लोकसंख्या रेशन दुकानांशी संबंधित आहे. Big decision of Solapur district administration; If you need ration grains, take both doses of corona


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : कोरोनाने सगळीकडेच हाहाकार माजवला आहे.  दरम्यान सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहे.मग यामध्ये लसीकरण नाही केलं तर पगार नाही, पेट्रोल नाही, किराणा नाही. अशाच प्रकारे सोलापूर जिल्हा प्रशासनाने बुधवारीशिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करताना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक करा, असे आदेश सर्व रेशन दुकानदारांना दिले आहे. दरम्यान याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ( १ डिसेंबर ) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांची बैठक घेतली. बैठकीत जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे निम्मी लोकसंख्या रेशन दुकानांशी संबंधित आहे.



जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांना खालील सूचना दिल्या आहेत. यामध्ये कार्डवरील सर्व सदस्य कोरोना लस घेतलीय का, याची चाचपणी करण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत. पहिला डोस घेतला असेल आणि दुसरा डोस घेतलेला नसेल तरी संबंधितांना धान्य देऊ नका, अशा सूचना आहेत, असे रेशन दुकानदारांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहे.

Big decision of Solapur district administration; If you need ration grains, take both doses of corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात