शिर्डीत अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे गेला दोन जणांचा जीव

शिर्डीत पडत असलेला अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Two killed in Shirdi due to unseasonal rains and hail


विशेष प्रतिनिधी

शिर्डी : राज्यात मागच्या दोन दिवांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने पिकांचं अतोनात नुकसान तर झालंच आहे पण दुसरीकडे अवकाळी पावसाचा माणसांवर देखील परिणाम होत आहेत. दरम्यान शिर्डीत उदरनिर्वाहासाठी आलेल्या दोन जणांचे मृतदेह आढले आहेत.

शिर्डीतील नगर – मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लागत असलेल्या ओढ्या जवळ एक अश्या दोन ठिकाणी दोन जणांचे मृतदेह आढळून आले.शिर्डीत पडत असलेला अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दोन्ही मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.पंचनामा करत असताना एका मृतदेहाजवळ पोलिसांना कागदपत्र सापडली आहेत.दरम्यान कागदपत्रांवरच्या माहितीनुसार एकनाथ हाटे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे.ती व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं राहणारी आहे.

दरम्यान एकनाथ हाटे यांच्याकडे मिळवून आलेल्या कागदपत्रावरून त्यांचा कुटूंबियांना संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. तर दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरु म्हणुन राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Two killed in Shirdi due to unseasonal rains and hail

महत्त्वाच्या बातम्या