पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी केली नियुक्ती


भारताचे सरन्यायाधीश या समितीत असायला हवे होते, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची देशाचे पुढील निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. दोघांनाही निवडणूक आयुक्त बनवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घेतला आहे, ज्यात गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस नेते अधीर.रंजन चौधरी हे देखील उपस्थित होते.A panel headed by the Prime Minister appointed Dyanesh Kumar, Sukhbir Sandhu as Election Commissioners



निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांच्या जागी केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या कायद्यावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

भारताचे सरन्यायाधीश या समितीत असायला हवे होते, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या कायद्याने बैठक केवळ “औपचारिकते”पुरती मर्यादित ठेवली आहे. अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, ज्या पॅनलने निवडणूक आयुक्तांचे नाव निश्चित केले आहे त्यात सरकार बहुमतात आहे. अशा परिस्थितीत त्यांना जे हवे ते घडते.

A panel headed by the Prime Minister appointed Dyanesh Kumar, Sukhbir Sandhu as Election Commissioners

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात