WATCH : बीएचआरमुळे हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले – एकनाथराव खडसे

WATCH NCP Leader eknath khadse Comment On on BHR Scam

BHR Scam : कुणाचं नाव आहे यामध्ये हे काही मला माहिती नाही, परंतु जे कोणी यामध्ये संबंधित असतील त्याची चौकशी होईल. यामध्ये लहान असो की मोठा असो हा काही राजकीय विषय नाही, याची चौकशी झाली पाहिजे. बीएचआर घोटाळ्याबाबत मी प्रतिक्रिया दिली आहे. बीएचआर मल्टीस्टेट सोसायटीमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी बीओडब्ल्यूकडून करण्यात यावी याची मागणी अॅडव्होकेट कीर्ती पाटील यांनी 2018 लाच केली होती. मधल्या कालखंडामध्ये चौकशीला वेग घेऊ शकला नाही. आता अनेक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी काही लोकांनी नाममात्र दरामध्ये घेतल्या. काही ठिकाणी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला आहे. काही ठिकाणी तारण ठेवलेले नसताना कर्ज घेतलं गेलं आणि काही ठिकाणी पात्रता नसतानाही 5 कोटींचे कर्ज दिलं गेलं. ते वसूल झालेला आहे असे अनेक आरोप त्याठिकाणी आहेत. हा राजकीय विषय नसून ठेवीदारांच्या सुरक्षित संरक्षणाचा विषय आहे. हजारो ठेवीदारांचा पैसा या ठिकाणी गेल्याने हजारो संसार त्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत, अशी प्रतिक्रिया बीएचआर घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. WATCH NCP Leader eknath khadse Comment On on BHR Scam

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात