वृत्तसंस्था
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना योद्ध्यांसाठी एक नवीन भेट घेऊन आले आहेत. पंतप्रधान मोदींनी आज 18 जून रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फ्रंटलाइन कामगारांसाठी क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी 1 लाख कोरोना वॉरियर्स सज्ज असल्याचं म्हटलं आहे. 26 राज्यांमधील 111 ट्रेनिंग सेंटरमधील कोव्हिड हेल्थकेअर फ्रंटलाईन वर्कर्सची प्रशिक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या प्रशिक्षण मोहीमेतून 1 लाख कोरोना वॉरियर्स प्रशिक्षण घेतील आणि ते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी सज्ज असतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.Customized Crash Course: 1 lakh Warriors to fight with the third wave of Corona; Prime Minister Narendra Modi launched another tremendous campaign
PM Modi will launch ‘Customized Crash Course' programme for Covid 19 Frontline workers’ on June 18 at 11 am via video conferencing. With 111 training centres across 26 states, the programme aims to skill and upskill over one lakh Covid warriors across the country: PMO — ANI (@ANI) June 16, 2021
PM Modi will launch ‘Customized Crash Course' programme for Covid 19 Frontline workers’ on June 18 at 11 am via video conferencing. With 111 training centres across 26 states, the programme aims to skill and upskill over one lakh Covid warriors across the country: PMO
— ANI (@ANI) June 16, 2021
1 लाख कोरोना वॉरियर्सना प्रशिक्षित करण्यासाठी आपण या मोहिमेला सुरूवात केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आपण दुसऱ्या लाटेत पाहिलं की कोरोनाचा व्हायरस हा त्याचं रूप बदलतो. त्यामध्ये म्युटेशन आलं आहे. या व्हायरसचं बदलणारं स्वरूप आपल्यासमोर नवं आव्हान निर्माण करतो आहे हे आपण पाहिलं. आपल्या समोर आता तिसऱ्या लाटेचं संकट आहे. अशात आता आपण या लाटेशी लढण्यासाठी तयारी करतो आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटंल आहे.
कोरोना महामारीने आपल्याला शास्त्र, सरकार, समाज, संस्था आणि व्यक्ती म्हणून आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत हे शिकवलं आहे. कोरोनासोबत लढणाऱ्या कोरोना वॉरियर्सना साथ देण्यासाठी आता आपण एक लाख लोकांना प्रशिक्षित करणार आहोत. हे प्रशिक्षण पुढील 2-3 महिन्यांमध्ये पूर्ण होईल.
या महामोहिमेतून कोव्हिडशी लढणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना नवी उर्जा मिळणार आहे. आपल्या देशातल्या युवकांना रोजगाराची संधीही मिळेल. मागच्या सात वर्षांमद्ये देशात नवे एम्स, नवे मेडिकल कॉलेज, नवे नर्सिंग कॉलेज यांच्या निर्मितीवर भर दिला आहे.
यामधल्या अनेक आरोग्य संस्था सुरूही झाल्या आहेत. फ्रंटलाईन वर्कर्स च्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमच्या अंतर्गत ट्रेनिंग घेणाऱ्यांना ते ट्रेनिंग मोफत दिलं जाईल. स्किल इंडियाचं प्रमाणपत्र, प्रशिक्षणार्थींच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था तसंच प्रशिक्षणार्थींना स्टायपेंडही सुरू करण्यात आलं आहे. या सगळ्यांचा प्रत्येकी 2 लाख रूपयांचा वीमाही उतरवण्यात येणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं.
कोरोनाचा संसर्ग गावांमधून रोखण्यासाठी, दूर, दूर पर्यंतच्या दुर्गम भागांमधून रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसंच प्रत्येक भागात लसीकरण लवकरात लवकर कसं होईल यासाठीही आम्ही केंद्र सरकार म्हणून कटिबद्ध आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more