जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात ; राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप


राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.Such riots happen whenever Sharad Pawar’s government comes; Former state minister Anil Bonde accused


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात, असा आरोप राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केले आहेत.अनिल बोंडे यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.

त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.



अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रूधुराचा वापर केला. परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्यांच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.

Such riots happen whenever Sharad Pawar’s government comes; Former state minister Anil Bonde accused

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात