Punjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदची बहीण लढवणार पंजाब विधानसभा निवडणूक, मात्र पक्षाचे नाव अद्याप गुलदस्त्यात


बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. अभिनेता सोनू सूदने रविवारी मोगा येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, ती कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोनू सूदने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. Sonu Sood Sister Malvika To Contest Punjab Assembly Elections 2022


वृत्तसंस्था

चंदिगड : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. अभिनेता सोनू सूदने रविवारी मोगा येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, ती कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोनू सूदने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनू सूदने अलीकडेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली आहे.

कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही

पत्रकार परिषदेत सोनू सूद म्हणाला की, मी सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. बहिणीच्या मनात असेल तर त्या मोगामधून विधानसभा निवडणूक लढवतील. मात्र, ती कोणत्या पक्षातून लढणार हे निश्चित झालेले नाही. ते वेळ आल्यावर कळेल.मी कोणाच्याही विरोधात प्रचार करणार नाही

सोनू सूद म्हणाला की, मी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याविरोधात प्रचार करणार नाही. कोणत्याही पक्षाचा स्टार प्रचारक होण्यासही त्याने नकार दिला. मात्र, तो त्याची बहीण मालविकाला प्रमोट करणार आहे. सोनू सूद म्हणाला की, मी कोणत्याही पक्ष किंवा नेत्याविरोधात काहीही बोलणार नाही.

नेत्यांनीही त्यांच्या जाहीरनाम्याशी करार करायला हवा, असे सोनू सूद म्हणााे. करारानुसार आश्वासने वेळेत पूर्ण न झाल्यास राजीनामा देण्याची व्यवस्था असावी. सोनू सूदची बहीण मालविका सध्या मोगामध्ये खूप सक्रिय आहे. राजकारणात येण्याचे मुख्य उद्दिष्ट जनतेची सेवा करणे हे असल्याचे सूद म्हणाला.

Sonu Sood Sister Malvika To Contest Punjab Assembly Elections 2022

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी