सोनू सूदवरील प्राप्तिकर छाप्यांचा तपास राजस्थानच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला, 175 कोटींच्या संशयास्पद व्यवहाराचा खुलासा

Income tax raids on Sonu Sood reach Rajasthan ministers, Rs 175 crore deal revealed

Income tax raids on Sonu Sood : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदविरोधात सुरू असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कारवाईदरम्यान त्याच्या कंपनीच्या तार राजस्थानचे सहकार मंत्री उदयलाल अंजना यांच्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या मते, सोनू सूद फाउंडेशनने परदेश निधी कायद्याचे उल्लंघन करून क्राउड फंडिंगद्वारे 2.1 कोटी रुपये उभारले आहेत. दरम्यान, सोनू सूदशी संबंध असल्याच्या संदर्भात प्राप्तिकर विभागाने जयपूर आणि उदयपूर येथील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपवर छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. Income tax raids on Sonu Sood reach Rajasthan ministers, Rs 175 crore deal revealed


विशेष प्रतिनिधी

जयपूर : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदविरोधात सुरू असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कारवाईदरम्यान त्याच्या कंपनीच्या तार राजस्थानचे सहकार मंत्री उदयलाल अंजना यांच्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या मते, सोनू सूद फाउंडेशनने परदेश निधी कायद्याचे उल्लंघन करून क्राउड फंडिंगद्वारे 2.1 कोटी रुपये उभारले आहेत. दरम्यान, सोनू सूदशी संबंध असल्याच्या संदर्भात प्राप्तिकर विभागाने जयपूर आणि उदयपूर येथील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपवर छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. राजस्थानचे सहकार मंत्री उदयलाल अंजना यांचेही या ग्रूपमध्ये शेअर्स आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या टीमला जयपूरस्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सोनू सूद यांची भागीदारी असलेल्या कंपनीमध्ये 175 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळले आहेत. सध्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. सोनू सूदशी संबंधित प्रकरणात, मुंबईहून आलेल्या टीमने शनिवारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर ही कारवाई केली.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या मते, विभागाची पथके अनेक शहरांमध्ये विविध कंपन्या आणि सोनू सूदच्या फाउंडेशनशी संबंधित व्यवहारांबाबत तपास करत आहेत. यासंदर्भात जयपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. जयपूरच्या आधी, पथकाने सोनू सूदच्या लखनऊ येथील संबंधित कंपनीच्या परिसरात छापा टाकला.

जयपूरस्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबतच्या व्यवहाराची कागदपत्रे लखनऊस्थित कंपनीकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमधून समोर आली. दुसरीकडे, सहकार मंत्री उदयलाल अंजना यांनीही आपण या कंपनीचे भागधारक असल्याचे मान्य केले आहे. शिवाय कंपनीमध्ये आणखी 25 भागधारक आहेत. सध्या प्राप्तिकर विभाग या कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यग्र आहे.

Income tax raids on Sonu Sood reach Rajasthan ministers, Rs 175 crore deal revealed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण