पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!

BJP Leader Kirit Somayya Allegations On CM Uddhav Thackeray Of Corruptions on Karad Railway Station

BJP Leader Kirit Somayya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड स्थानकावरच पोलिसांनी रेल्वेतून उतरवून ताब्यात घेतलं. यानंतर सोमय्यांनी त्या ठिकाणीच पत्रकार परिषद घेत ठाकरे-पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांनी सडकून टीका केली. BJP Leader Kirit Somayya Allegations On CM Uddhav Thackeray Of Corruptions on Karad Railway Station


विशेष प्रतिनिधी

सातारा : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड स्थानकावरच पोलिसांनी रेल्वेतून उतरवून ताब्यात घेतलं. यानंतर सोमय्यांनी त्या ठिकाणीच पत्रकार परिषद घेत ठाकरे-पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांनी सडकून टीका केली.

कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक होत म्हणाले, येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यासही जाणार आहे, अडवून दाखवा, असं थेट आव्हानच सोमय्यांनी दिलंय.

उद्धव ठाकरेंवर घोटाळ्याचा आरोप

सोमय्या म्हणाले की, गुरुवारी मी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला मा. उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरू आहे. 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. मला रोखणार आहे का?”

मला कोणत्या अधिकारानुसार रोखताय?

सोमय्या म्हणाले की, “ठाकरे सरकारची ही ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, सीएसएमटी स्टेशनबाहेर रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारतोय, कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय? मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रोखण्याचा मला ठाकरे सरकारने प्रयत्न केला. मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय- सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला, त्यावर पोलीस पळून गेले.”

मुख्यमंत्री-गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी घेणार का?

किरीट सोमय्या म्हणाले की, “माझी मागणी गृहमंत्री वळसे पाटलांकडे ज्या पोलिसांनी गैर कायदेशीरपद्धतीने ऑर्डर दाखवली, कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर, कराड पोलिसांनी दिली, या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?”

BJP Leader Kirit Somayya Allegations On CM Uddhav Thackeray Of Corruptions on Karad Railway Station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण