कोरोनामुळे गर्भवतींच्या गुंतागुंतीत वाढ, ‘आयसीएमआर’च्या अभ्यासातील विश्लेषण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनामुळे गर्भवती महिलांमध्ये आरोग्यविषयक गुंतागुत निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या एका अभ्यासात कोविड संक्रमित गर्भवती महिलांमधील गुंतागुंतीविषयी उदा. अकाली प्रसूती, गर्भपात आणि अर्भकाच्या जन्मामध्ये अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे. ICMR did study in Pregnant women

‘आयसीएमआर’ने राज्य सरकार, महाराष्ट्र शिक्षण आणि औषध विभाग वैद्यकीय आणि महापालिकेच्या मदतीने ‘प्रेग कोविड’ नावाची रजिस्ट्री तयार केली. गर्भवती महिला किंवा त्यांच्या मुलांमध्ये कोविडमुळे कोणते दुष्परिणाम आहेत, हे जाणून घेण्यासाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोरोनाबाधित गर्भवती महिलांचा तपशील त्या नोंदणीवर अपलोड करण्यात आला. या डेटा बँकेच्या मदतीने भविष्यातील गर्भवती महिलांसाठी धोरण बनवण्यास मोठी मदत होऊ शकते.



ज्या महिलांना टीबी, अशक्तपणा, मधुमेह यांसारखा आजार आहे आणि त्यांना कोविड झाला आहे, त्यांच्यात मृत्यूचा धोका वाढत असल्याचेही या अभ्यासात आढळून आले. आयसीएमआरने राज्यातील १९ रुग्णालयांतून कोरोनाबाधित ४ हजार २०३ गर्भवती महिलांचा डेटा गोळा करण्यात आला. त्यापैकी ३ हजार २१३ महिलांनी बाळाला जन्म दिला; तर ७७ महिलांचा गर्भपात झाला आणि ६ टक्के बालमृत्यू झाले.

ICMR did study in Pregnant women

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात