दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : दोन सज्ञान व्यक्तीना त्यांच्या धर्माचा विचार न करता, त्यांचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे. एका आंतरधर्मीय जोडप्याला संरक्षण देताना अलाहाबाद कोर्टाने हे म्हणणे मांडले आहे. न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता आणि दीपक वर्मा यांच्या खंडपीठाद्वारे हे मत नोंदवले गेले आहे. याचिका करणारा मुलगा हिंदू आणि मुलगी ही मुस्लिम आहे.Adults have a right to choose their partner irrespective of their religion says Allahabad HC

मुलीच्या घरचे लग्नासाठी परवानगी द्यायला तयार आहेत. मुलाची आईची देखील मंजूरी आहे. परंतू मुलाच्या वडिलांची या लग्नास मंजूरी नाही. त्यामुळे भविष्यात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाकडून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती.



या याचिकेवर आपले म्हणणे मांडताना ‘दोन प्रौढ व्यक्तींच्या आई वडीलांना देखील त्यांच्या नात्याला विरोध करता येणार नाही’, असे खंडपीठाने सांगितले आहे. दोघांचे धर्म वेगळे असले तरी त्यांना जोडीदाराची निवड करण्याचा हक्क आहे. आणि त्यांचे पालकदेखील या नातेसंबंधाला विरोध करू शकत नाहीत, असेही सांगितले आहे.

उत्तर प्रदेशचे रहिवासी शिफा हसन आणि तिच्या जोडीदाराने कोर्टात संयुक्त याचिका दाखल केलेली होती. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून ते त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहत असल्याचे सांगितले आहे.

शिफा हसनने तिच्या याचिकेमध्ये असे सांगितले आहे की, तिने मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मांत येण्यास अर्ज केलेला होता. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवला गेला. शिफाच्या आई वडिलांची ह्या लग्नाला परवानगी आहे तर मुलाच्या आईची देखील लग्नाला मंजूरी आहे. मात्र, मुलाच्या वडिलांची परवानगी नाही.

त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोर्टाने याचिकाकर्त्यांना संरक्षण दिलेले आहे. तसेच त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगितले आहे. याचिकाकर्त्यांना कोणत्याही व्यक्तीकडून कुठलाही त्रास होणार नाही याची खात्री करण्याचे आदेश न्यायालयाकडून पोलिसांना दिले गेलेले आहेत.

Adults have a right to choose their partner irrespective of their religion says Allahabad HC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात