West Bengal:तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार;ममता बॅनर्जींचा प्रचार करणार नाहीत


विशेष प्रतिनिधी

भवानीपूर : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला खरा मात्र आता त्यांनी भाजप विरुद्ध प्रचार करण्यासाठी थेट नकार दिला आहे. West Bengal: Trinamool-affiliated Babul Supriyo refuses to campaign against BJP; Mamata Banerjee will not campaign

तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतरही बाबुल सुप्रियोंनी ममता बॅनर्जींच्या बाजूने आणि भवानीपूरमध्ये भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला आहे.



2021 च्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपचे स्टार प्रचारक होते. परंतु, केंद्रीय मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. टीएमसीमध्ये आल्यानंतर ते भवानीपूर ममता बॅनर्जींचा प्रचार करतील अशी आशा होती. पण, त्यांनी प्रकार करण्यास नकार दिला आहे.

प्रचार का करणार नाहीत ?

रविवारी दुपारी तृणमूल भवनात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले की, ‘भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. भवानीपूरमधील भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल माझ्या वकील होत्या. त्या एक लढवय्या महिला आहेत. माझ्या बाजुने त्यांनी अनेक खटले लढवले आहेत. मला त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा नाही.

West Bengal: Trinamool-affiliated Babul Supriyo refuses to campaign against BJP; Mamata Banerjee will not campaign

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात