काँग्रेसची एकीकडे स्वबळाची तयारी; दुसरीकडे आपल्याच मंत्र्यांविरुद्ध ७-८ आमदारांची नाराजी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिके पाठोपाठ नागपूर महापालिकेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. पण एकीकडे या स्वबळाच्या जोर-बैठका मारत असताना दुसरीकडे मात्र आपल्याच मंत्र्यांविरुद्ध काँग्रेसच्या आमदारांची नाराजी आहे आणि ती नाराजी महाराष्ट्रातच मिटवण्यापेक्षा दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडच्या कानावर घालण्याची तयारी या आमदारांनी चालवली आहे. टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या आधारे ही बातमी दिली आहे. On the one hand, the Congress is preparing for independence; On the other hand, 7-8 MLAs are angry against their own ministers !!

महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टाळून हे 7-8 आमदार दिल्लीत काँग्रेस हायकमांडला भेटायला चालले आहेत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची ते भेट घेणार आहेत तसेच त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचीही भेटीची वेळ मागितली आहे



काँग्रेसचे महाराष्ट्रात फक्त 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर आहे तरी देखील काँग्रेसच्या कार्यपद्धतीत फारसा बदल झाला नसल्याचे हे निदर्शक आहे. अखंङ काँग्रेसचे जेव्हा 200 च्या आसपास आमदार असायचे तेव्हा देखील अशाच स्वरूपाच्या मंत्री विरुद्ध आमदार अशा तक्रारी असायच्या आणि त्या प्रदेश पातळीवर सोडवण्याऐवजी केंद्रीय पातळीवर हायकमांडकडे जाऊन त्या सोडवल्या जायच्या.

एकीकडे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नाना पटोले आज बैठक घेत आहेत. तेथेच स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. या स्वबळाच्या जोर-बैठका काढत असतानाच 7-8 आमदारांची नाराजी मात्र प्रदेश पातळीवर दूर करण्याची नेत्यांची क्षमता नाही. नागपूर महापालिकेत स्वबळाचे नारे दिले असले तरी याच नागपूर मध्ये नुकतेच विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार आयत्या वेळेला बदलून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याच मंत्र्यांविरुद्ध काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडकडे धाव घेणे याला राजकीय दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे.

On the one hand, the Congress is preparing for independence; On the other hand, 7-8 MLAs are angry against their own ministers !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात