पाच राज्यातील निवडणूक रॅलीज काँग्रेसने पुढे ढकलल्या, पण कारण फक्त कोरोनाचे की आणखी काही??


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये कोरोना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने या राज्यांमधील निवडणूक रॅलीज पुढे ढकलल्या आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. Congress postponed election rallies in five states, but only because of Corona or something else ??

पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या संकल्पनेतील “लडकी हूं, लढ सकती हूँ” या मॅरेथॉन देखील उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात येत आहेत. परंतु कोरोनामुळे त्या देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापुढची मॅरेथॉन वाराणसीमध्ये होणार होती. याखेरीज अन्य 7-8 शहरांमध्ये मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ते सध्या स्थगित करण्यात आले असून अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.



पण काँग्रेसने रॅलीज पुढे ढकलण्यामागचे कारण जरी कोरोनाचे दिले असले तरी प्रत्यक्षात आणखी वेगळी कारणे आहेत का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे नववर्षाच्या सुरुवातीलाच जे परदेशात गेलेत आहेत ते अद्याप भारतात परत आलेले नाहीत. शिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या स्वतः आयसोलेशन मध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसने रॅलीज आयोजित केली तरी त्याला संबोधित कोण करणार? हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधल्या निवडणूक रॅलीज पुढे ढकलल्या आहेत का?, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.

एकीकडे काँग्रेसने उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमधल्या निवडणूक रॅली पुढे ढकलली असल्या तरी भाजपचे मात्र या पाचही राज्यांमध्ये जोरदार मेळावे सुरू आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने देखील मेळाव्यांमध्ये आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत सुरुवातीला प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात मेळाव्याची आणि “लडकी हू, लढ सकती हूं” या उपक्रमाद्वारे आघाडी घेतली होती. परंतु आता काँग्रेसने स्वतःहून आपल्या मेळाव्यांना कोणाचे कारण देत ब्रेक लावला आहे. यामागे फक्त कोरोनाचे कारण आहे की राहुल गांधी अद्याप परदेशातून परत आलेच नसल्याचे खरे कारण आहे?, यावर राजकीय वर्तुळात खल सुरू आहे.

Congress postponed election rallies in five states, but only because of Corona or something else ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात