शिवसेना-भाजप युतीचा अधिकार मोदी – ठाकरेंना, अब्दुल सत्तारांना नव्हे; चंद्रकांत खैरे यांनी सुनावले!!


प्रतिनिधी

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युती करायची की नाही याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदी असताना याबाबत विधाने करू नयेत. त्यांना तो अधिकार नाही, अशा कडक शब्दात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना सुनावले आहे. Shiv Sena-BJP alliance right Modi – Thackeray


अब्दुल सत्तारांचं मोठं विधान : म्हणाले – रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्रे सांभाळतात, त्या मुख्यमंत्री होण्यास कोणाचीही हरकत नसेल!


अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचे राजकीय मतभेद फार जुने आहेत. सत्तार काँग्रेसमध्ये असल्यापासूनचा त्याला इतिहास आहे. याचा संदर्भ देखील चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्यात आला आहे. अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत, असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे ठाकरे परिवाराची उत्तम संबंध आहेत. शिवसेना-भाजप युतीची खिल्ली त्यांच्याच हातात आहे, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी काल केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ज्यांना अधिकारच नाही. त्या अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत विधाने करुन संभ्रम फैलावू नये, असे चंद्रकांत खैरे यांनी त्यांना सुनावले आहेत.

Shiv Sena-BJP alliance right Modi – Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती