काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, विमानसेवा प्रभावित, रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम सुरू


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : काश्मीरमध्ये मंगळवारी पुन्हा बर्फवृष्टी झाल्यामुळे अनेक विमाने रद्द करावी लागली. रस्त्यांवरही बर्फ हटविण्याचे काम सुरू आहे. उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी होत आहे.काश्मीर खोºयाच्या उंचावरील भागात अनेक ठिकाणी थांबून थांबून बर्फवृष्टी होत आहे.Snowfall in Kashmir, Uttarakhand, airlines affected, snow removal work on roads underway

जम्मू-काश्मीरची ग्रीष्मकालीन राजधानी श्रीनगरमध्ये या वर्षी प्रथमच बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टी व कमी दृश्यमानता यामुळे काश्मीरमध्ये येणारी व जाणारी विमाने प्रभावित झाली. मंगळवारपर्यंत १६ उड्डाणे रद्द करण्यात आली. हवामानाच्या स्थितीत सुधारणा होताच विमानसेवा सुरू होईल.



गुलमर्ग व पहलगामचे पर्यटक रिसॉर्टसह सर्व प्रमुख शहरांतील बर्फ हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. गुलमर्गमध्ये सोमवारी रात्री किमान तापमान उणे ५ अंश नोंदले गेले. रविवारच्या रात्री हे तापमान उणे ५.८ होते. पहलगाममध्ये सोमवारी रात्री उणे १.२ तापमान होते.

रविवारी रात्रीचे तापमान उणे ३ अंश सेल्सिअस होते. काजीगुंडमध्ये उणे ०.६, कोकेरनागमध्ये उणे ०.४, कुपवाडामध्ये उणे ०.२ तापमान होते. काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी किंवा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.

काश्मीरमध्ये ४० दिवसीय चिल्लई कलां कालावधी २१ डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. या कालावधीत कडाक्याची थंडी पडते व तापमानातही घट होते. यामुळे प्रसिद्ध दल सरोवराबरोबरच अनेक ठिकाणी पाईपलाईपमधील पाण्यासह जलाशये गोठतात.

या कालावधीत उंचीवरील भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यताही जास्त असते. चिल्लई कलां ३१ जानेवारीला समाप्त झाल्यानंतर २० दिवसीय चिल्लई-खुर्द व १० दिवसांचा चिल्लई बच्चा कालावधी सुरू होतो.

उत्तराखंडच्या चमोली व रुद्रप्रयाग या पर्वतीय जिल्ह्यांमधील उंचावरील भागात मंगळवारी नव्याने बर्फवृष्टी झाली. त्यामुळे या परिसरात शीतलहर पसरली आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ कस्तुरी मृग उद्यानात मंगळवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पसरली. दोन्ही जिल्ह्यांत शीतलहर पसरल्यामुळे पारा घसरला आहे.

Snowfall in Kashmir, Uttarakhand, airlines affected, snow removal work on roads underway

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात