त्यांचे पूर्वज म्हणालयचे आम्ही अ‍ॅक्सीडेंटल हिंदू, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांंधींवर निशाणा


विशेष प्रतिनिधी

अमेठी : साप्रंदायकतेविरोधात कायदा आणून काही लोक हिंदूंना कैद करण्याचा विचार करत आहेत. निवडणूक आल्यानंतर हे लोक हिंदू बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे की आम्ही अ‍ॅक्सिडेंटल हिंदू आहोत. त्यामुळे हे लोक स्वत:ला हिंदू म्हणू शकत नाहीत, असा निशाणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना लगावला आहे.Accidental Hindu, Yogi Adityanath targets Rahul Gandhi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यामध्ये जन विश्वास यात्रेचं आय़ोजन केलं आहे. याच यात्रेअंतर्गत अमेठीमध्ये बोलताना महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते या राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिहल्ला करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही काहीही लपवलं नाहीय.



आम्हाला कसलीच भिती वाटत नाही. जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण म्हणायचो, आजही म्हणतो आणि पुढेही म्हणत राहील की, गर्व से कहो हम हिंदू है.योगी आदित्यनाथ म्हणाले, मंदिरात कसं बसतात, हे देखील अमेठीच्या माजी खासदारांना (राहुल गांधी) माहिती नाही. त्यांनी ज्या मंदिराला भेट दिली,

तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना कसं बसतात हे शिकवलं. हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद काय आहे, हे त्यांना ठाऊक नाही. तरीही ते चुकीचा प्रचार करत आहेत. काँग्रेस, सपा किंवा बसपाच्या एकाही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने किंवा कार्यकत्यार्ने करोना काळात लोकांना मदत केली नाही.

यात त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. जशा निवडणुका आल्या, ही लोकं इथे आली. निवडणुका झाल्यानंतर पुढची साडेचार वर्ष ते गायब होतील. इथे दिसणार देखील नाहीत.

Accidental Hindu, Yogi Adityanath targets Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात