नवी मुंबईसह ठाण्यालाही मिळणार मालमत्ता करात सवलत


नवी मुंबई  महापालिकेने १९ जुलै २०१९ रोजी यासंदर्भातला ठराव मंजूर करून सरकारला पाठविलेला आहे. मात्र, त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती.परंतु आता भाजप शिवसेना एकमेकांविरुद्ध आहेत.Navi Mumbai and Thane will also get property tax relief


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेने प्रस्ताव पाठवला

तर या भागातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तयारी सरकार करील, अशी घोषणा केली.नवी मुंबई महापालिकेने १९ जुलै २०१९ रोजी यासंदर्भातला ठराव मंजूर करून सरकारला पाठविलेला आहे. मात्र, त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती.



परंतु आता भाजप शिवसेना एकमेकांविरुद्ध आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रशासकांना ठराव पाठवायला सांगितले आहे.या घोषणेमुळे अन्य महापालिकांनी असेच प्रस्ताव पाठविले तर त्याविषयी सरकार काय करणार, अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे.

Navi Mumbai and Thane will also get property tax relief

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात