Akhilesh Yadav : सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची चीनकडून नावे बदलण्याच्या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, चीनने मुख्यमंत्री योगींकडूनच नावे बदलण्याचे शिकले आहे. मात्र, आता माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार अखिलेश याबाबतीत योगींच्या खूप पुढे आहेत. Akhilesh Yadav ahead of Yogi Adityanath in renaming cities, RTI reveals read in Details
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची चीनकडून नावे बदलण्याच्या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, चीनने मुख्यमंत्री योगींकडूनच नावे बदलण्याचे शिकले आहे. मात्र, आता माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार अखिलेश याबाबतीत योगींच्या खूप पुढे आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ 2 जिल्ह्यांची नावे बदलली, तर अखिलेश यादव यांनी 2012 ते 2015 दरम्यान 9 जिल्ह्यांची नावे बदलली. 2012 मध्ये तर त्यांनी एकाच दिवसात यातील 8 जिल्ह्यांची नावे बदलली होती.
इंडिया टुडेने दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार, अखिलेश यादव यांनी ३० जुलै २०१२ रोजी प्रबुद्ध नगरचे नाव बदलून शामली केले होते. याशिवाय भीम नगरला संभल, पंचशील नगर हापूर, महामाया नगर हाथरस, ज्योतिबा फुले नगर अमरोह, कांशीराम नगर कासगंज, छत्रपती शाहूजी महाराज नगरला अमेठी, रमाबाई नगरला कानपूर देहात असे नाव देण्यात आले. यानंतर 15 जानेवारी 2015 रोजी संत रविदास नगरचे नाव बदलून भदोही असे करण्यात आले.
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यकाळात यूपीतील दोन जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. 18 ऑक्टोबर 2018 रोजी योगी सरकारने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आणि 23 नोव्हेंबर 2018 रोजी फैजाबादचे नाव बदलून मूळचे ‘अयोध्या’ केले आहे.
नावे बदलण्यावरून विरोधकांनी योगी सरकारवर कायम हल्लाबोल केला आहे. फैजाबाद आणि अलाहाबादची नावे बदलण्यावरून विरोधकांनी योगी सरकारला अनेकदा घेरले आहे. इस्लामिक अस्मितेमुळे योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद आणि अलाहाबादची नावे बदलल्याचा आरोप विरोधक करत आहेत. योगी सरकारने आपल्या कार्यकाळात केवळ ठिकाणांची नावे बदलली, काहीही केले नाही, असे अखिलेश वारंवार सांगत असतात.
Akhilesh Yadav ahead of Yogi Adityanath in renaming cities, RTI reveals read in Details
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App