डिजीटल इंडियाचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार ,अर्थव्यवहारांसाठी यूपीआयचा पर्याय, ४५६ कोटी व्यवहारांची वर्षात नोंद


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डिजिटल इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नाला भारतीयांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. २०२१ मध्ये भारतीयांनी आर्थिक व्यवहार करण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआय) पर्याय निवडला. वर्षभरात ४५६ कोटी आर्थिक व्यवहार झाले आहेत.Digital India’s PM’s dream come true, UPI’s alternative to economics, 456 crore transactions recorded annually

आत्तापर्यंतचा हा विक्रम आहे. नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. सव्वा आठ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण करण्यात आली. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ट्रान्झॅक्शनच्या संख्येत दुपटीने भर पडली आहे. गेल्या वर्षभरात एकूण 71.59 लाख कोटींचे 38 अब्ज ट्रान्झॅक्शन करण्यात आले.11 एप्रिल 2016 पासून भारतीय रिझर्व्ह बँक व नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल व्यवहार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. कोविड प्रादूभार्वाच्या कालखंडात सामाजिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात यूपीआय वापरण्याच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली.

अर्थ जगतातील संशोधन संस्था जेफरीजने वर्ष 2022 मध्ये भारतातील 50 टक्के डिजिटल पेमेंट यूपीआयद्वारे होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुलभ पेमेंट पद्धतीमुळे यूपीआयच्या वापरात वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १०० कोटी , २०२० मध्ये २०० कोटी, २०२१ मध्ये चारशे कोटींपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार यूपीआयद्वारे झाले आहेत.

यूपीआयद्वारे किमान 50 ते कमाल एक लाख रुपयांचे अर्थव्यवहार एका क्लिकवर करता येतात. लाभार्थींच्या बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्यक असते भिम , फोन पे , गूगल पे ,मोबिक्विक , पेटीएम द्वारे डिजिटल ट्रान्झॅक्शन पूर्ण केले जाऊ शकते.

Digital India’s PM’s dream come true, UPI’s alternative to economics, 456 crore transactions recorded annually

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था