महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र जास्तच


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. In Maharashtra, the number of corona is low but the death rate is high

आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे ६१ मृत्यू नोंदवण्यात आले, तर मिरा भाईंदर ३३, कोल्हापूर २५, मुंबई २२ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्युदर १.७७ टक्क्यांवर इतका आहे.



आज नोंद झालेल्या ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील तर १५४ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा एक लाख तीन हजार ७४८ वर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात १२,२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची एकूण संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ६९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

In Maharashtra, the number of corona is low but the death rate is high

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात