मानवी जीवनाला गती देणाऱ्या चारचाकी मोटारींचा अनोखा प्रवास


माणसाने स्वत:ला गती देण्यासाठी आधी इतर प्राण्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला बैल, घोडा इ. पाळीव प्राण्यांवर बसून त्यांना पळवायला सुरुवात केली. नंतर चाक आणि आसावर एक बैठक घातली आणि ती बैठक या प्राण्यांना ओढायला लावली. ही स्वत: आरामात बसून एका जागेवरून दुसरीकडे जाण्याकरता बनवलेली प्राथमिक वाहनव्यवस्था होती. जसजशी इतर यंत्रे शोधली गेली, तसतशी ही वाहनव्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम आणि आरामदायी बनत गेली. आणि आज तर स्वयंचलित वाहने हा जगातील एक मोठा उद्योग बनला आहे. The unique journey of four-wheelers that speed up human life

माणसे वाहून नेऊ शकणारी पहिली चारचाकी कार इ. स. १७६८ मध्ये निकोलस-जोसेफ क्युग्नोटने बनवली. ही वाफेवर चालणारी गाडी होती. अंतज्र्वलन इंजिनावर चालणारी पहिली गाडी इ. स. १८०७ मध्ये फ्रान्स्वा आयझाक द रिवाजने बनवली. यात इंधन म्हणून हायड्रोजन वापरला जायचा.

कार्ल बेंझने इ. स. १८८६ मध्ये पेट्रोलवर चालणारी कार बनवली आणि ऑटोमोबाइल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर साऱ्या जगात मोटारींची क्रेझ निर्माण झाली. ती आज देखील काही कमी झालेली नाही. आपल्याक़डे चार चाकी मोटार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्याला कोणीही अपवाद नाही. आता एकविसाव्या शतकात विद्युतऊर्जेवर चालणाऱ्या गाडय़ा रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. दुचाकी स्वयंचलित वाहनांचा प्रवास थोडा उशिरा सुरू झाला.

इ. स. १८८४ मध्ये इंग्लंडच्या एडवर्ड बटलरने पेट्रोलवर चालणारे अंतज्र्वलन इंजिन असलेली पहिली दुचाकी खरे तर तीनचाकी तयार केली. पुढे १८९४ मध्ये हिल्डेब्रांड आणि वुल्फम्युलर यांनी आताच्या दुचाकीच्या आद्य स्वरूपातील गाडय़ांचे व्यावसायिक उत्पादन करायला सुरुवात केली. दुचाकी असो वा चारचाकीचे इंधन बदलत गेले आहे, त्यातील सुखसोयी वाढल्या आहेत, असंख्य बदल झाले आहेत आणि होत आहेत; पण ही गाडी चालण्याची यांत्रिक संकल्पना मात्र अजून तरी फारशी बदललेली नाही.

The unique journey of four-wheelers that speed up human life

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात