विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेत बऱ्याच वेळा अवमानास्पद वागणूक मिळत, असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. या ऑनलाइन सर्वेक्षणात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जवळपास १२०० भारतीय वंशाच्या नागरिकांना त्यांची मते विचारण्यात आली होती. In the United States, citizens of Indian descent suffer greatly, and abusive behavior increases
या बाराशे जणांपैकी जवळपास निम्म्या जणांना कधी ना कधी त्यांच्या वंशावरून अवमानास्पद वागणूक मिळाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.‘सोशल रिॲलिटिज् ऑफ इंडियन अमेरिकन्स’ या अहवालामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेतच जन्माला आलेल्या नागरिकांनाही या वंशभेदाला सामोरे जावे लागत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांमध्ये, दर दहा जणांमागे आठ जणांनी भारतीय वंशाच्याच व्यक्तीशी विवाह केला आहे. तर, यापैकीही चार जणांनी अमेरिकेतच जन्माला आलेल्या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडले आहे.
या भारतीयांच्या आयुष्यात धर्माची भूमिका महत्त्वाची असली तरी धार्मिक प्रथांचे पालन फारसे होताना दिसत नाही. सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्यांपैकी ४७ टक्के जण रोज प्रार्थना करतात, तर २७ टक्के जण आठवड्यातून किमान एकदा प्रार्थनास्थळाला भेट देतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App