विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित आणि भविष्यात रिलीज होणाऱ्या सर्वच चित्रपटांना स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. A film on the life of actor Sushant Singh will be released soon, three movies will come
सुशांतच्याच जीवनावर बेतलेला ‘न्याय – दि जस्टिस हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. तर सुशांतच्या जीवनावर बेतलेल्या ‘सुसाईड ऑर मर्डर – ए स्टार वॉज लॉस्ट’, शशांक हे चित्रपट प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत.
हे सगळे चित्रपट संबंधित अभिनेत्याचे आत्मवृत्त नसून त्या अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये नेमके काय घडले? याची नेमकेपणाने माहिती देखील त्यातून मिळत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. संजीव नरूला यांच्या खंडपीठाने यासंदर्भात सुशांत याचे वडील कृष्णकिशोर सिंह यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोणत्याही दिग्दर्शकाने आपल्या मुलाच्या नावाचा किंवा त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा चित्रपटामध्ये वापर करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती.
सुशांतच्या वडिलांनी केलेले युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केले.एखाद्या घटनेची माहिती जगजाहीर असेल आणि त्यावर एखाद्या व्यक्तीने चित्रपट तयार केला तर तो खासगीपणाच्या अधिकाराचा भंग ठरत नाही.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App