नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत ; अतुल भातखळकरांची जावेद अख्तर यांच्यावर खोचक टीका


जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली. He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी या साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे.दरम्यान जावेद अख्तर यांनी देखील नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थिती नोंदवली होती. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची.”

तसेच जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली.दरम्यान जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात टीकास्त्र सोडले आहे.

टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की , “पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर हे आता इतिहासकारांच्या भूमिकेत आले आहेत. नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत.” ब्रिगेडी राजकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय, असा घणाघातही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात