आत्मनिर्भर भारतातून संरक्षणाचा बूस्टर डोस; अमेठीत बनणार ५ लाख ए के २०३ एसॉल्ट रायफली!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतून विविध उद्योगांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले असतानाच एक आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संरक्षण खात्यासाठी लागणारी सर्व सामग्री भारतातच निर्मिती व्हावी यासाठी देशभरातल्या विविध कंपन्यांना मोठ्या ऑर्डर देण्यात येत आहेत. अमेठीतील कोरवा फॅक्टरीत अशीच एक मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या उपयोगी अत्याधुनिक एके 203 एसॉल्ट रायफली बनविण्याची ऑर्डर कोरवा फॅक्टरीला देण्यात आली आहे.Military orders 5 lakhs AK 20 assault rifles in Korea factory amethi


आत्मनिर्भर भारतात नौदलाचेही योगदान; ३९ पैकी ३७ युद्धनौका – पाणबुड्या भारतातच निर्मित!!


या रायफल्सचा उपयोग सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी प्रामुख्याने होतो. या रायफलचे सुरूवातीचे तंत्रज्ञान रशियन होते. परंतु आता भारतीय तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाची त्याला जोड देऊन या रायफली भारतातच तयार होणार आहेत. येत्या दीड वर्षांमध्ये या रायफलचे उत्पादन पूर्ण करण्याची योजना आहे. त्याच बरोबर कोरवा फॅक्टरीत तयार होणारे अन्य शस्त्रास्त्रे निर्यात करण्याचा देखील भारताचा विचार आहे अन्य देशांमधून त्यांच्या संरक्षण गरजांनुसार शस्त्रास्त्रे निर्मिती आणि संशोधनाला देखील भारत आत्मनिर्भर भारत योजनेतून प्रोत्साहन देऊन संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरींचे रूपांतर सात संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये केल्यानंतर त्यांना भारतीय संरक्षण दलांनी तब्बल 65 हजार कोटी रुपयांच्या सामग्रीच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. येत्या दोन वर्षात या ऑर्डर्स पूर्ण करायच्या आहेत. त्याचबरोबर आता अमेठीतील कोरवा फॅक्टरीत पाच लाख ए के 203 सॉल्ट रायफली बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

Military orders 5 lakhs AK 20 assault rifles in Korea factory amethi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण