एसटी कर्मचार्‍यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा – प्रवीण दरेकर


दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे. Transport Minister should pave way by coordinating with ST employees: Praveen Darekar


विशेष प्रतिनिधी

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कामगार ठाम असल्याचे चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील एसटी कामगार हे आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत.

मात्र हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा या साठी राज्यसरकार कारवाई करण्याचा मार्ग अवलंबत आहे.या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून संप मागे न घेतल्यास मेस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत कारवाई करावी लागेल असा इशारा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. यावेळी दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे.

पुढे दरेकर म्हणाले की ,मेस्मासारखी कठोर कारवाई करुन हे आंदोलन चिरडता येणार नाही. कर्मचार्‍यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

Transport Minister should pave way by coordinating with ST employees: Praveen Darekar

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात