मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!

नाशिक : मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!, या दोन्ही गोष्टी आजच घडून आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या इटली दौऱ्यात बरेच द्विपक्षीय करार केले. भारत आणि इटली यांच्या संरक्षण सहकार्य वाढविले. इटलीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय बातचीत केली. पण मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना दिलेले मेलोडी चॉकलेटचे पॅकेटच फार गाजले. मेलोडी चॉकलेट देऊन मोदींनी मेलोनीला पटवले, अशा प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याचे लाखो मीम्स तयार झाले. पार्ले कंपनीच्या एक रुपयाच्या मेलोडी चॉकलेटची क्रेझ एका झटक्यात जगभरात पोहोचली. मोदींनी मेलोडी चॉकलेटची फुकटात जाहिरात केली. पण या निमित्ताने एक भारतीय ब्रँड त्यांनी जगभर पोहोचविला.

राहुल गांधींच्या बुडाला आग

पण हे सगळे घडत असताना इकडे भारतात मात्र राहुल गांधींच्या बुडाला जुनीच आग लागली. राहुल गांधींनी आज रायबरेली मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुफान भाषण केले. त्यांनी मोदींना आणि अमित शाहांना गद्दार म्हणून जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी आता टॉफी वाटत फिरणे बंद करावे. मोदींनी सगळा देश अमेरिका, अंबानी आणि अदानींना विकलाय. मोदींनी संविधानावर आक्रमण केले आहे. मोदी आणि शाह देशाचे गद्दार आहेत. संघाचे लोक मला माफी मागायला सांगतात, पण मी माफी मागणार नाही. मी पुन्हा पुन्हा मोदी आणि शाह यांना गद्दारच म्हणणार. कारण त्यांनी लोकांचा हक्क मारलाय, अशी भाषा राहुल गांधींनी वापरली.

टीकेसाठी सुद्धा नवीन मुद्दे नाहीत

पण राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेमध्ये नवीन काहीच नव्हते. मोदींनी देश अदानी आणि अंबानींना विकल्याची टीका त्यांनी यापूर्वी सुद्धा केली होती. पण राहुल गांधींना किंवा काँग्रेसला या टीकेचा काही फायदा झाला नव्हता. 2019 पासून होत असलेल्या या टीकेचा मोदींवर कुठलाच प्रतिकूल परिणाम झाला नाही. त्यांच्या सत्तेचा एकही चिरा ढासळला नाही. पण तरीसुद्धा राहुल गांधी आपल्या जुन्या चुकांवरून शिकले नाहीत. त्यांनी 2026 मध्ये सुद्धा तीच जुनी टीका चालू ठेवली. त्यांना मोदींवर टीका करायला सुद्धा नवीन मुद्दा काढता आला नाही.

Prime Minister Modi brought as a gift, a very, very good toffee- Melody

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात