ठाण्याची चिमुकली सायली पाटील, वय अवघे १० वर्षे अन् सायकलवरून केला ४ हजार किलोमीटर प्रवास


सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण ४ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिने आतापर्यंत २२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. Chimukli Sayali Patil of Thane, only 10 years old, traveled 4,000 kilometers by bicycle


विशेष प्रतिनिधी

सातारा : ठाण्यातील चिमुकलीने वय अवघे १० वर्षे अन् ४ हजार किलोमीटर प्रवास तोही सायकलवरून सुरू केला आहे. काल सातारा येथे सायली पाटील हिचे खासदर उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सायलीचे अभिनंदन करत फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी वाट्टेल ती मदत करण्याचे आश्वासनही उदयनराजे भोसले यांनी दिले.केवळ अवघे १० वय असलेल्या सायलीच्या या जिद्दीचे सध्या काैतुक होत आहे.



सायली पाटील हिने काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली. सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण ४ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

तिने आतापर्यंत २२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून १८०० प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास १८ दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे.काल २३ व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले.

Chimukli Sayali Patil of Thane, only 10 years old, traveled 4,000 kilometers by bicycle

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात