NITIN GADKARI : रस्ते म्हणजे विकास : नितीन गडकरी ! देशात १२ हजार किमीचे नवे ‘ग्रीन हायवे’-वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक बदल-काश्मिर ते कन्याकुमारी हाय वे


विशेष प्रतिनिधी

नागपूर :नितीन गडकरींना रोडकरी असेही संबोधतात .त्यांनी देश रस्त्यांनी जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आणि ते अविरत सुरू आहे. येत्या तीन-चार वर्षांत देशात सुमारे १२ हजार किलोमीटरचे नवे ‘ग्रीन हायवे’ (green highway)बांधण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(central minister nitin gadkari) यांनी दिली.Roads are development: Nitin Gadkari! 12,000 km new ‘Green Highway’ in the country – Environmentally friendly changes in the transport sector – Kashmir to Kanyakumari Highway

कोणत्याही प्रदेशाच्या किंवा देशाच्या विकासासाठी रस्ते हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करीत असतात. ते विकासाचे मार्ग असतात. यापुढे रस्ते उभारताना ते पर्यावरणपूरक करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

नवे महामार्ग हे अत्यल्प प्रदूषण निर्माण करणारे राहतील असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वत्र पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन ही कनेक्टिव्हिटी, जिल्हास्तरावर आणि मागास भागांना कनेक्टिव्हिटी वाढविली जाईल. त्यातून रोजगार निर्माण होईल. शिवाय पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचा मार्गही मोकळा होणार आहे.

सध्या दिल्ली ते मद्रास, दिल्ली ते त्रिवेंद्रम, दिल्ली ते हैदराबाद, दिल्ली ते बंगळुरू ही सर्व उत्तरेतून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक ही मुंबई-पुण्याहून जात होती. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. त्यासाठी सुरतला एक ग्रीन एक्स्प्रेस हायवे तयार केला जात आहे. त्यामुळे उत्तरेतून राजस्थान, गुजरात इकडे जाणारी वाहतूक सुरतहून नाशिक, अहमदनगर आणि सोलापूरहून दक्षिणेत जाईल.

श्रीनगर ते कन्याकुमारी

या मार्गावरील रस्त्यांच्या जाळ्यांबाबत विस्ताराने सांगताना गडकरी म्हणाले की, जोजिला टनेलमध्ये आपण पाच हजार कोटी रुपये वाचविले.ही टनेल आशियातील सर्वांत मोठी १४.५ कि.मी.ची टनेल आहे.

या टनेलमधून झिडमोर ही कारगिलच्या खाली आहे.या टनेल पासून बाबा अमरनाथ दहा किलोमीटरवर आहे. टनेल ते अमरनाथ रोप वे तयार करायचा आणि कारगिलच्या वरती हिल स्टेशन तयार करायचे.

डावोससारखे पर्यटनस्थळ साकारू शकते. झिडमोर टनेलवरून श्रीनगरला येऊ आणि श्रीनगरला आल्याबरोबर हा जो दिल्ली-अमृतसर-कटरा हायवे आहे तो मध्ये जम्मू-श्रीनगर रस्त्याला मिळेल.

तेथून आपण आठ तासात श्रीनगरहून दिल्ली, सहा तासांत दिल्ली-कटरा, दिल्ली-अमृतसर चार तासांत, अमृतसरहून दिल्लीला आणि दिल्लीला आल्यानंतर तो दिल्ली-मुंबई हायवेला लागेल.

म्हणजे बारा तासांत मुंबई. मुंबईहून पुढे सुरतपासून वळला की दक्षिणेत जाईल. खऱ्या अर्थाने काश्मीर ते कन्याकुमारी असा हा हायवे होईल.

Roads are development: Nitin Gadkari! 12,000 km new ‘Green Highway’ in the country – Environmentally friendly changes in the transport sector – Kashmir to Kanyakumari Highway

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात