अनिल परब यांची बेकायदेशिर रिसॉर्ट तोडण्यासााठी लवकरच आदेश, मंत्रीपद काढून घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करणार, किरीट सोमय्या यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले आहे. हा रिसॉर्ट तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ५-७ जानेवारीला आदेश येतील, तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसºया आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत, असा इशारा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.Order to demolish Anil Parab’s illegal resorts soon, will demand removal of ministerial post from Election Commission, demands Kirit Somaiya

सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप खोटेनाटे प्रयत्न केले. शेवटी पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची नोटीस पाठवली आहे. १७ डिसेंबरच्या या नोटीसला ३ जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचं आहे.



मला विश्वास आहे की ५-७ जानेवारीला महाराष्ट्र सरकारकडे अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश येतील. फक्त अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेल असं नाही. त्यापुढे जाऊन आम्ही आणखी विभागांमध्ये तक्रारी केल्या आहेत. हे पैसे कुठून आले? स्वत:च्या नावावर मंत्री म्हणून थ्री फेज कनेक्शन घेतलं.

बेकायदेशीर बांधकाम केले. मंत्री, आमदार सीआरझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतो. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशीही आमची पुढील याचिका असेल, असा इशारा सोमय्यांनी अनिल परब यांना दिला.

तोडकामाचे आदेश आले की महाराष्ट्र सरकार किती लांबवतं हे पाहू. मात्र, तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.

उद्धव ठाकरे यांचे १८ नेते आणि मंत्री यांची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. एकूण २८ घोटाळे बाहेर आले आहेत. दर आठवड्यात एक-एक घोटाळा बाहेर येणार याची मी खात्री देतो. पुढील ४ घोटाळे एका महिन्यात उघड करणार आहे,असेही सोमय्या यांनी सांगितले.

Order to demolish Anil Parab’s illegal resorts soon, will demand removal of ministerial post from Election Commission, demands Kirit Somaiya

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात