रामदास कदमांचा गुस्सा फुटला अनिल परबांवर; पण खदखदीचा लाव्हा उसळला शिवसेनेत…!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचेच १००% नुकसान झाले आहे, अशा शेलक्या शब्दांत घरचा आहेर शिवसेनेचे नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहेच, त्या पाठोपाठ आज शिवसेनेचे माजी मंत्री आणि कोकणातले नेते रामदास कदम यांचा गुस्सा शिवसेनेचे सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फुटला आहे…!! Ramdas Kadam targets Anil Parab

अनिल परब यांच्यावर एकापाठोपाठ एक तोफा त्यांनी डगुन पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत, पण त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेतला खरा गद्दार मी नाही तर अनिल परब आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांच्या साथीने रत्नागिरी आणि कोकणातली शिवसेना संपवतो आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी अनिल कदम अनिल परब यांचा बाप देखील काढला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निधी कमी देतो असे अशी धमकी देतो तो निधी काय अनिल परबचा बापाचा आहे का?, असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. त्याच वेळी मी कट्टर शिवसैनिक आहे शिवसेना सोडणार नाही. शिवसेनेतच मरेन_ असा शब्द त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एक प्रकारे रामदास कदम यांचा गुस्सा अनिल परब यांच्यावर फुटला असला तरी लाव्हा मात्र संपूर्ण शिवसेनेत उसळला असल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडून रामदास कदमांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. अनिल परब शिवसेना संपवायला निघाले आहे. ते शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालालया निघाले आहेत, गद्दार मी नाही तर शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. असे रामदास कदम म्हणाले. अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर आपली भूमिका काय असेल हे देखील रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.



पत्रकार परिषदेनंतर जर पक्ष नेतृत्वाकडून किंवा पक्षाकडून तुमच्यावर कारवाई केली गेली तर आपली काय भूमिका? या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम यांनी सांगितले की, “मी पक्षाच्याविरोधात कुठेही काहीही बोललेलो नाही. अनिल परब म्हणजेच जर पक्ष असेल, तर आम्ही बसू कायमचे घरी. मग काही इलाज नाही. अनिल परब म्हणजेच जर पक्ष असेल आणि रामदास कदमचे पक्षासाठीच योगदान म्हणजे काहीच नाही. अशीच जर भूमिका भविष्यात घेतली गेली तर त्याला कोण काय करू शकते?

अनिल परबांवर घणाघात करताना रामदास कदम म्हणाले की, अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. शिवसेनेची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांनी हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या आमदारास बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्यासाठी अनिल परब निघाला आहे, गद्दार तो आहे. घोषणा द्यायच्या असतील तर त्याच्याविरोधात द्या. जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कुठे होता?” असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला.

याचबरोबर, “ तुमची वैयक्तिक मालमत्ता म्हणजे शिवसेनेची नाही. तुमच्या हॉटेलवर बोललो म्हणजे ती काय शिवसेनेची मालमत्ता नाही. मी शिवसेनेवर बोललेलो नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख नाही. उगाच माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका. मी कडवा शिवसैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. मी कधीच स्वत:ला डाग लावून घेतला नाही, असेही रामदास कदम म्हणाले.

अन्याय सहन करायला मर्यादा असतात

अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाहीत. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल परबला हरामखोर म्हटले आहे. त्या हरामखोराला थांबावा, याला मंत्रीपद दिले ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही तर शिवसेना वाढवण्यासाठी दिले आहे, असे त्या पत्रात लिहिलेय. या माझ्या भावना आहेत. ” असे रामदास कदम म्हणाले.

 परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही

अनिल परब म्हणजे सध्या पक्षप्रमुखच आहे, कारण त्याच्याविरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो असंच चाललेय. एसटी कामगारांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांची भेट घ्यायला अनिल परबांकडे वेळ नाही आणि रामदास कदमच्या मुलाला संपवण्यासाठी तीन-तीन दिवस दापोलीत ठाण मांडून बसायला वेळ आहे, हे निषेधार्य आहे.अशा शब्दांमध्ये कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोपानंतर रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतर आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam targets Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात