राज्यातले नेते केंद्रात सहकाराबद्दल भरभरून “बोलले”; पण सहकाराविषयी “केले” काहीच नाही; राधकृष्ण विखे-पाटलांचे पवारांवर शरसंधान


विशेष प्रतिनिधी

प्रवरानगर : राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल फक्त भरभरून “बोलले”. मात्र, त्यांनी काहीच काम “केले” नाही, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांवर शरसंधान साधले. त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखून मंचावरील मान्यवरांनी ओळखून स्मितहास्य केले. विखे पाटील प्रवरानगर येथे पहिल्या सहकार परिषदेत बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थिती होते. कार्यक्रमात बैलगाडी आणि नांगर यांची प्रतिकृती देत अमित शहा यांचा सन्मान करण्यात आला. Many leaders from the state went to the center, but they did nothing about co operatives; laments Radhakrishna Vikhe Patil

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, सहकाराच्या पंढरीत आज सोन्याचा दिवस आहे. या सहकार पंढरीत अमित शहा यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी सभा होत आहे. आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली, अशा शब्दांत त्यांनी यावेळी शहा यांचे कौतुक केले. देशासमोर प्रवरा कारखाना हे मॉडेल असल्याचेही ते म्हणाले.



विखे-पाटील पुढे म्हणाले की, मधल्या काळात सहकार सहकार चळवळीची पीछेहाट झाली आहे. मात्र, आता आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असा आशावाद त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाहून व्यक्त केला. राज्यातील सहकारी कारखानदारीचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकांनी खासगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला, असे म्हणत त्यांनी नाव शरद पवारांचे, अजित पवारांचे नाव न घेता टोलेबाजी केली.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, खरे तर राज्यातल्या सहकार चळवळीला आधार देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला संजीवनी दिली आहे. राज्यातले अनेक नेते केंद्रात केले. ते फक्त सहकारावर भरभरून “बोलले”. मात्र, त्यांनी सहकाराबद्दल काहीही “केले” नाही, अशी टीका त्यांनी पवारांचे तसेच अन्य कोणाचेही नाव न घेता केली. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखून मान्यवरांनी स्मितहास्य केले.

अमित शहा यांच्या हस्ते हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि बीज बँकेच्या राहीबाई पोपरे यांचा गौरव करण्यात आला. राहीबाई यांचा पैठणी, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश धोंगडे यांचा साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांचा अमित शहा यांनी एक लाखाचा चेक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

Many leaders from the state went to the center, but they did nothing about co operatives; laments Radhakrishna Vikhe Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात