Big News: सांता क्लॉस नरेंद्र मोदी ! ख्रिसमसला देशासाठी खास गिफ्ट…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज ख्रिसमसच्या आनंदात भर टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ३ गिफ्ट दिले. येत्या ३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. हे गिफ्ट देऊन पंतप्रधान देशासाठी सांता क्लॉस बनले आहेत.त्यांनी मुलांसह आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांना देखील १० जानेवारीपासून लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याची घोषणा केली .Big News: Santa Claus Narendra Modi’s special gift for the country on Christmas Eve

३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे आज देशातील ९० टक्के जनतेला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाशी लढताना देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, त्यामुळेच या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण मिळावं यासाठी १० जानेवारीपासून लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. जगभरात अनेक देश ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडत आहेत.

त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानंतर लसीचा आणखी बूस्टर डोस मिळणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

हा बूस्टर डोसही १० जानेवारीपासून मिळणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

लसीकरणाबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांकडे आपण लक्ष द्यायला नको असं मोदी म्हणाले. आपण आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे देशाचं कोरोनापासून रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं.

Big News: Santa Claus Narendra Modi’s special gift for the country on Christmas Eve

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात