ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्याला पंतप्रधांची मंजूरी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला (फेज-2) मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकार 12 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये 33 टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे.PM approves second phase of Green Energy Corridor

गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या 7 राज्यांमध्ये फेज-2 मध्ये 10750 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाइन बांधण्यात येणार असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. फेज-1 चे सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील एकूण वीजनिर्मितीपैकी 70 टक्के वीज कोळशापासून मिळते. पण कोळशाचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे सरकारला देशात हरित उर्जेला चालना द्यायची आहे. आता सरकारने दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे.

ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे उद्दिष्ट पारंपारिक पॉवर स्टेशनच्या मदतीने सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून वीज ग्राहकांना ग्रीडद्वारे हस्तांतरित करणे आहे. मंत्रालयाने 2015-16 मध्ये हरित ऊजेर्पासून निर्माण होणाºया विजेचा वापर करण्यासाठी इंट्रा स्टेट ट्रान्समिशन सिस्टम प्रकल्पाला मान्यता दिली होती.

त्यात तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या 8 राज्यांचा समावेश आहे. सरकारला आता त्याची व्याप्ती वाढवून कोळशापासून निर्माण होणाºया विजेचा वाटा कमी करायचा आहे, जेणेकरून पर्यावरणाला जास्तीत जास्त फायदा मिळेल.

त्याचबरोबर भारत आणि नेपाळमधील महाकाली नदीवर धारचुला (उत्तराखंड) येथे पूल बांधला जाईल. यासह लवकरच के लिऊ नेपाळसोबत सामंजस्य करार केला जाईल. याचा फायदा नेपाळसोबतच उत्तराखंडमध्ये राहणाºयालोकांना होणार आहे.

PM approves second phase of Green Energy Corridor

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी