बिल्किस बानूच्या विषय काढून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब!!


प्रतिनिधी

मुंबई : गुजरात मधील बिल्किस बानू प्रकरणाचा विषय काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. दसरा मेळावा मोठा कोणाचा??, याचा निकाल शिवतीर्थ आणि बीकेसीच्या मैदानावर लागला.
By removing the issue of Bilkis Banu, Uddhav Thackeray sealed Pawar’s role in the Dussehra gathering



 

पण त्यामध्ये भूमिका मात्र पुन्हा – पुन्हा त्याच मांडल्या गेल्या. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला गद्दारी शब्दाची लाखोली वाहिली. पण त्यावेळी हिंदुत्व विषयावरून शिंदे गटाला छेडताना त्यांनी गुजरात मधल्या बिल्किस बानू प्रकरणाचा उल्लेख केला. बिल्किस बानूवर बलात्कार झाला. तिचे नातेवाईक मारले. हे तुमचे हिंदुत्व होते का? बलात्कार करणाऱ्यांना सोडून दिले हे तुमचे हिंदुत्व होते का?, असा सवाल करून शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यातले नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले बाकीचे मुद्दे नेहमीचेच शिंदे गटावर शरसंधान साधणारे होते. त्याचबरोबर त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचाही विशेष उल्लेख करून महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सरसंघचालक आणि सहकार्यवाह यांची नावे घेणे सोडली तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले त्यांच्या संदर्भातले बाकी मुद्दे जुनेच होते. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी काही मुद्द्यांवर प्रत्युत्तरे दिली आहेत.

By removing the issue of Bilkis Banu, Uddhav Thackeray sealed Pawar’s role in the Dussehra gathering

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात