दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??


विशेष प्रतिनिधी

देशभर दसरा साजरा होत असताना सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांची. या मेळाव्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी एवढ्या दिल्या आहेत की त्यामुळे दसऱ्याचे बाकीचे कार्यक्रम कितीही मोठे होणार असले, तरी ते झाकोळले गेल्याचे दिसते आहे.If Balasaheb Thackeray brand overpowers Pawar and Gandhi brands, then what will happen to NCP and Congress future??

दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभर होणारे संचलन आणि नागपुरात होणारा मुख्य कार्यक्रम त्याचबरोबर नागपुरात नियमितपणे साजरा होत असलेला धम्मचक्र परिवर्तन दिन हे कार्यक्रम “नियमित” मानून माध्यमांनी त्यांच्या बातम्या जरूर दिल्या आहेत, पण माध्यमांपासून सोशल मीडिया पर्यंत सर्वाधिक चर्चा आहे, ती दसरा मेळावा मोठा होणार कुणाचा?? ठाकरेंचा की शिंदेंचा?? याचीच!!ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या असंख्य बातम्या वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या अंगांनी दिल्या आहेत. पण या मेळाव्यांकडे बारकाईने पाहिले, तर ठाकरे काय किंवा शिंदे काय दोन्हीकडे “ब्रँड बाळासाहेबच” मोठा होताना दिसतो आहे!! किंबहुना बाळासाहेब ठाकरे हे मोठे ब्रँड असल्यामुळेच त्यांना जास्तीत जास्त आपल्याकडे खेचून घेण्याची ही स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे अशी राजकीय लढत आहे. ही लढत होत असताना बाळासाहेबांचा ब्रँड नुसता महाराष्ट्रव्यापी मोठा होतो असे नव्हे, तर त्याचा बोलबाला देशभर ब्रँडच्या स्वरूपाने होतो आहे आणि इथेच नेमकी राजकीय मेख आहे!!

भाजपने राखले योग्य अंतर

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून भाजपने योग्य ते राजकीय अंतर राखले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दसरा मेळाव्याच्या वेळी म्हणजे सायंकाळी नागपुरातल्या धम्म परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यांची दोन्ही भाषणे आपण ऐकणारच नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अर्थातच ठाकरे गटाच्या पाठीशी उभे आहेत. शिंदे गट स्वबळावर आपला मेळावा यशस्वी करण्यासाठी झटतो आहे. त्यातही पोलिसी रिपोर्ट खरे मानायचे झाले, तर शिंदे गट गर्दी जमवण्याच्या बाबतीत ठाकरे गटावर मात करणार असल्याचे दिसते आहे. पण असे असतानाही दोन्हीकडे “बाळासाहेबठाकरे ब्रँड” मोठा होणार असेल, तर मग महाराष्ट्रातल्या दुसऱ्या ब्रँडचे नेमके होणार काय??… आणि देशभरात जो ब्रँड चालतो त्याचे देखील होणार काय?? या संदर्भातल्या बातम्या अथवा चर्चा मात्र माध्यमांमध्ये अथवा सोशल मीडियामध्ये दिसत नाहीत.

मोदी ब्रँड भाजपला तारतो

जसा महाराष्ट्रात “बाळासाहेब ठाकरे ब्रँड” मोठा आहे, तसाच देशभरात नरेंद्र मोदी हा ब्रँड मोठा आहे. त्या ब्रँड वर महाराष्ट्रासह बाकीच्या राज्यांमध्ये भाजपची राजकीय नौका दमदारपणे पार होईल. पण महाराष्ट्रात दुसरा असलेला “पवार ब्रँड” हा ठाकरे ब्रँड पुढे जर फिका पडला, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन धर्मनिरपेक्ष पक्षांचे काय होईल?? हा कळीचा प्रश्न आहे!!

पवार ब्रँड, राहुल ब्रँड

राष्ट्रवादी काँग्रेस आज ठाकरे गटाच्या मागे उभी आहे. पण ठाकरे गट देखील हिरीरेने “बाळासाहेब ब्रँड”च चालवणार आहे. मग तिथे राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभी राहिली किंवा न राहिली तरी ब्रँड चालवण्याच्या बाबतीत ठाकरे गटालाही फारसा फरक पडणार नाही. अशा स्थितीत खऱ्या अर्थाने “बाळासाहेब ठाकरे ब्रँड” संपूर्ण महाराष्ट्र व्यापी झाल्याचेच दिसत आहे आणि म्हणूनच सध्या अस्तित्वात असलेले दुसरे ब्रँड म्हणजे राष्ट्रवादीचा “पवार ब्रँड” आणि काँग्रेसचा “राहुल ब्रँड” यांची तुलना बाळासाहेब ठाकरे ब्रँडशी केल्यानंतर त्यांचे नेमके काय होईल??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

 धर्मनिरपेक्ष ब्रँडचे होणार काय??

शिवाय दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गर्दी खेचताना दोन्ही गट यशस्वी झाले तरी देखील ब्रँड मोठा होतो, तो “बाळासाहेब ठाकरे ब्रँडच”!! मग धर्मनिरपेक्ष पक्षांचे दोन ब्रँड भविष्यात नेमके किती चालतील??, तरुणाईला आपल्याकडे कितपत आकर्षित करू शकतील??, हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासाठी गंभीर प्रश्न ठरणार नाही का??

If Balasaheb Thackeray brand overpowers Pawar and Gandhi brands, then what will happen to NCP and Congress future??

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण