शिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे!!; अर्थ घ्या समजवून!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत ठाकरे कुटुंबातील संघर्षाची झलकही पाहायला मिळते आहे. कारण सुप्रीम कोर्टातल्या आणि निवडणूक आयोगासमोरच्या लढाईत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू एडवोकेट निहार बिंदूमाधव ठाकरे हे शिंदे गटाची बाजू लढविणाऱ्या वकिलांच्या फौजेत आहेत. Balasaheb Thackeray’s grandson nihar bindumadhav Thackeray pleading for shinde faction in Supreme Court

शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण कोणाला द्यायचे याबाबत निवडणूक आयोगाला निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मंगळवारी झालेल्या युक्तिवादात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटाची बाजू लढवणा-या वकिलांच्या फौजेत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि हर्षवर्धन पाटलांचे जावई एडवोकेट निहार बिंदूमाधव ठाकरे हे देखील असल्याचे समोर आले आहे.

निहार ठाकरे यांची प्रतिक्रिया

बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे सुपूत्र निहार ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात वकील असून शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलमध्ये त्यांचा समावेश आहे. मंगळवारी आलेल्या निकालानंतर निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहात हे मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तेव्हाच त्यांना सांगितले होते.

शिंदे गटाच्या बाजूने आम्ही बाजू मांडली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सर्व गोष्टींची योग्य ती पडताळणी करुन निर्णय देईल. पण ठाकरे गटाला पुरावे सादर करण्यासाठी अजून मुदत मिळेल असे वाटत नाही, असे निहार ठाकरे यांनी सांगितले.

त्यांनाच पक्षाचा दर्जा

ज्या गटाकडे सर्वात जास्त संख्याबळ असते त्याच गटाला निवडणूक आयोग राजकीय पक्षाचा दर्जा देतो. आम्ही निवडणूक आयोगाला दीड लाख अॅफिडेव्हिट पाठवली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन शिंदे गटालाच अधिकृत पक्षाची मान्यता देतील, असा दावा निहार ठाकरे यांनी केला आहे.

 कौटुंबिक वाद ते पक्षाचा वाद

निहार ठाकरे यांनी शिंदे गटाची बाजू सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर मांडणे ही फक्त कायदेशीर बाब राजकीय पक्षासाठी कायदेशीर बाब नाही तर ठाकरे कुटुंबात मधला एक महत्त्वाचा सदस्य शिंदे गटासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालय लढाई लढतो आहे, याला राजकीय बाबतीत पातळीवर तसेच कौटुंबिक पातळीवर देखील विशेष महत्त्व आहे. कारण मातोश्रीच्या संपत्ती वरून मोठा वाद आहे. स्मिता जयदेव ठाकरे आणि निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाला साथ दिली आहे. याला कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर देखील महत्त्व आहे.

Balasaheb Thackeray’s grandson nihar bindumadhav Thackeray pleading for shinde faction in Supreme Court

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण